सोलापूरसह अन्य भागातील सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर २१ रुपयांनी वाढवले आहेत. यापूर्वी एक नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे १०१.५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर १७४९ रुपये इतके झाले आहेत. दरम्यान घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल दोनशे रुपयांची कपात केली होती. यानंतर त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...