लग्नसराईचा हंगाम सुरू होताच देशांतर्गत सराफा बाजारात पुन्हा एकदा गर्दी जमताना दिसत आहे. बुधवारपासून सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात तेजीने व्यवहार होत असून शनिवार, २ डिसेंबर रोजीही सोने-चांदीच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. त्यामुळे लग्नसराईत खरेदीसाठी ग्राहकांना जादा खिसा रिकामा करावा लागेल.
लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर भारतीय बाजारात सोन्याच्या दरांनी जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवीन विक्रम नोंदवले तर, चांदीचा भावही नव्या विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक तसेच देशांतर्गत बाजारातही मागणी वाढल्यामुळे सोन्या-चांदीला झळाळी आली असून पुढील वर्षी सोन्याची किंमत ७० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या स्तरावर उडी घेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोन्या-चांदीची खरेदी किंवा सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्वरा करा.
सोन्या-चांदीत दरवाढ
तुम्ही लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल, तर सर्वप्रथम २ डिसेंबर २०२३ ची नवीन किंमत तपासा. डिसेंबरच महिना सुरू होताच सोन्या-चांदीचे भावही वाढू लागले आहेत. शनिवारी, २ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत २२० रुपयांनी वाढून ६,३१० रुपये प्रति ग्रॅम तर २२ कॅरेट सोने आज २०० रुपयांनी महागले आणि ५,७८५ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले. तर चांदी ७६,५४६ रुपये प्रति किलोवर खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सोन्या-चांदीचे वायदे कमी झाले
सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढीचे सत्र सुरू असताना दोन्ही मौल्यवान धातूचे वायदे मात्र घसरले आहेत. सोन्याचे एप्रिल २०२४ फ्युचर्स MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर ६३,३५५ रुपये तर मार्च चांदीचे फ्युचर्स ७७,९६५ रुपयांवर व्यवहार करत होते.
दरम्यान, गेल्या आठवड्यात घसरते डॉलर निर्देशांक आणि फेडरल रिझव्र्हच्या अधिकाऱ्याचे विधान यामुळे पुढील वर्षी मध्यवर्ती बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता बळावली त्यामुळे व्यापार्यांची खरेदी वाढली आणि कॉमेक्सवरील सोन्याने मे महिन्यानंतरच्या उच्चांक गाठला.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉलमार्क जारी केले जातात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, तर 22 कॅरेटवर ९१६, २१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० अंकित असते. बहुतेक सोन्याचे दागिने २२ कॅरेटमध्ये विकले जातात, तर काही लोक १८ कॅरेट खरेदीही प्राधान्य देतात. सोन्याचे कॅरेट २४ पेक्षा जास्त नसते कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते.
हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. हॉलमार्क हे सोन्याची सरकारी हमी असते, जे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क जारी करते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.