गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आजारांचे निदान अचूक होणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल. सेवाभावी वृत्तीने सुरू होणारा रुग्णसेवेचा हा यज्ञकुंड अव्याहतपणे सुरु राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
प्राण वाचविणाऱ्या आरोग्य सेवा गरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल. विदर्भातील जनतेपर्यंत या सेंटरच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पोहोचतील असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
सामान्य जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन तत्पर आहे. त्यासोबतच खाजगी व सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
Post Views: 72