सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या कारागृह शिपाई यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.ही शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विकास गंगाराम कोळपे वय 34 रा. जेल पोलीस वसाहत सोलापूर असे स्वतःवर गोळी झाडून घेतलेले कारागृह शिपायचे नाव आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेनगार्ड येथे ड्युटी वर असताना कारागृह शिपाई विकास कोळपे यांनी स्वतःवर SLR रायफलने छातीवर गोळी मारून घेतल्याने त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्याचे सांगण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियावर स्वतःला सिंघम म्हणत जन्मतारीख आणि मृत्यु दिनांक टाकून भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. या घटनेनंतर सोलापूर पोलिस विभागात एकच खळबळ माजली आहे
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























