मागील वर्षी गायक केके यांचं निधन झालं. लाइव्ह कॉन्स्टर्टमध्ये गात असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी अखेरचा निरोप घेतला. आता ब्राझीलमधून अशीच एक घटना समोर आली आहे. बुधवारी ब्राझीलमधील गॉस्पल सिंगर पेड्रो हेनरिक यांचं लापेड्रो हेनरिक ब्राझीलमधील एका धार्मिक कार्यक्रमात गात होते. स्टेजवर गाताना त्यांची तब्येत बरी होती. मात्र परफॉर्मन्स देताना अचानक ते मागील बाजूस झुकले गेले, त्यानंतर स्टेजवरच कोसळले आणि त्याच क्षणी त्यांचं निधन झालं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.इव्ह कॉन्सर्टमध्ये गात असताना निधन झालं आहे. ते ३० वर्षांचे होते.
व्हिडिओमध्ये पेड्रो हेनरिक स्टेजवर गाताना दिसत आहेत. ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत गाणं गात होते. पांढऱ्या रंगाच्या पँट-सूटमध्ये आपल्या गाण्याचा आनंद घेत ते स्टेजवर परफॉर्म करत होते. गाताना ते काही वेळ थांबले होते. त्यानंतर त्यांचा तोल गेला आणि स्टेजवर ते कोसळले.
स्टेजवर कोसळल्यानंतर पेड्रो हेनरिक यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, पेड्रो हेनरिक यांनी स्टेजवर जाताना, परफॉर्म करण्याआधी त्यांच्या मित्राला त्यांना थकल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं होतं. पण तरीही ते स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी पोहोचले, पण तिथेच ते कोसळले. डॉक्टरांनी पेड्रो हेनरिक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं आहे.