यंदाच्या आयपीएल साठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यामध्ये ३३३ खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात येणार असून त्यात ३० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या २०२४ हंगामासाठी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे लिलाव होणार आहे. यामध्ये एकूण ३३३ खेळाडूंचा लिलाव होणार आहे, तर संघांना ७७ स्लॉट आहेत, त्यापैकी ३० विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. २३ खेळाडूंनी २ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर १३ खेळाडूंची नोंदणी १.५ कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये करण्यात आली आहे. ३३३ खेळाडूंपैकी २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे.
आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरात टायटन्स ३८.१५ कोटी रुपयांच्या सर्वाधिक पर्ससह लिलावात प्रवेश करेल, तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी १४.५ कोटी रुपयांची पर्स आहे. एका ट्रे़डमुळे हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये गेल्याची चर्चा खूप होती. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन्सने रोहित शर्माच्या जागी पंड्याला आयपीएल २०२४ साठी त्यांचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे.