कायदेशीर लग्न करुन पत्नीप्रमाणे सांभाळण्याचे आमिष दाखवून आपल्यावर गेल्या सात वर्षांपासून अत्याचार केला आणि लग्नास नकार दिल्याची तक्रार ४६ वर्षीय महिलेने दिल्याने संशयित आरोपीविरुध्द गुन्हा नोंदला आहे. हा प्रकार १९ ऑगस्ट २०१६ ते १६ मार्च २०२३ या काळात वेळोवेळी झाल्याचे फिर्यादिने म्हटले आहे.श्रीकांत आडम (रा.४०३/४, जोडभावी पेठ, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादित पिडितेने म्हटले आहे की, यातील पिडित महिला सोलापूर शहरातील एका परिसरात ४६ वर्षीय महिला भाडयाने वास्तव्यास आहे. यातून आरोपीने तिला कायदेशीर लग्न करतो, पत्नीप्रमाणे सांभाळतो असे आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली. वेळोवेळी लग्नाबद्दल विचारणा करुनही टाळाटाळ करण्यात आली. २०१६ पासून मार्च २०१३ पर्यंत हा प्रकार सुरु होता. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने पिडितने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदला असून, तपास सपोनि साळुंखे करीत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...