Thursday, January 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला, देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 30, 2023
in maharashtra
0
महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला, देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे.

 

 

 सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला लागलेले अनास्थेचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दहा पंधरा वर्षात सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर सिंधुदुर्गवासियांना दाखविण्यात आले. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. २०१८ साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 

समुद्राखालचे अंतरंग दाखविणारा प्रकल्प

भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ५६ कोटी निधी मंजूर झाला तर त्यातील काही निधी वितरितही झाला होता. मात्र वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे.

 

पर्यटनात नव्या संकल्पना, नवे आकर्षण कधी आणणार

सिंधुदुर्गात मागील दहा पंधरा वर्षात पर्यटन वाढीसाठी नव्याने एकही संकल्पना राबविण्यात आली नाही. किंवा कोणतेही नवे पर्यटन आकर्षण निर्माण केले नाही. सरकारे बदलत असली तरीही जिल्ह्यातील नेतृत्वांनी पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला नाही.

 

 

नेमकी अडचण कुठे आली, जिल्हावासियांना उत्तर द्यावे लागणार

पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव देश पातळीवर वर गेले असते. परिणामी सिंधुदुर्गमध्ये उच्च दर्जाचे पर्यटन प्रस्थापित झाले असते. जिल्ह्यातील इतर किनारपट्टीवर पर्यटन वाढीस लागले असते. या प्रकल्पाची संकल्पना, अहवाल आणि निधीची तरतूदही करण्यात आली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या, याचे राज्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

 

 

राणे, चव्हाण द्वयींवर भिस्त

जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी धडाडीने काम करण्यास प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकताच नौदल दिन यशस्वी करून दाखविला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या द्वयींनी सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पात लक्ष घातला तरच हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. अन्यथा गुजरातच्या स्वप्नांमध्येच धन्यता मानण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर येणार आहे.

 

 

कसा होता पाणबुडी प्रकल्प

सिंधुदुर्गात साकारला जाणारा पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह २४ प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर १०० ते १५० कोटींची उलाढाल होणार होती. प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

 

 

महाराष्ट्राची संकल्पना गुजरात साकारते

गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवित आहेत. जानेवारीत व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे. समुद्रात ३०० फूट खोल जाऊन पर्यटकांना समुद्रात बुडलेल्या द्वारका शहराच्या अवशेषांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

Post Views: 95
Previous Post

लग्न करुन पत्नीप्रमाणे सांभाळण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद पिडित महिलेने दिल्यानंतर ईसमावर गुन्हा दाखल

Next Post

नाशिकचे सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नाशिकचे सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

नाशिकचे सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात; 'या' कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

ताज्या बातम्या

करकंब येथे सुवासिनींनी तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात केला साजरा

January 14, 2026

पानगावात दुकानाला आग लागल्याने ५० लाख रुपयांचे साहीत्य जळून खाक

January 14, 2026

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रेणुका देवीची महाआरती

January 14, 2026

श्रीपूरचे भाऊसाहेब कुलकर्णी सामाजीक सेवा पुरस्काराने सन्माननीत

January 14, 2026

जिंक्यपद खो-खो स्पर्धा – महाराष्ट्राचा डबल धमाका! पुरुष–महिला संघांची उपांत्य फेरीत धडक

January 14, 2026

ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीअखेर संपणार सरपंचांनाच प्रशासक म्हणून संधी द्यावी – राम पाटील

January 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन पारध येथे साजरा

January 14, 2026

सोलापुरात १९ जानेवारीला पं. कृष्णेंद्र वाडीकर यांची ‘संगीत संध्या’ कार्यक्रम.

January 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

byतरुण भारत
January 14, 2026
0

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...

प्रभाग क्र. १३ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार कॉर्नर बैठक – विकास व सुशासनाचा निर्धार

byतरुण भारत
January 13, 2026
0

सोलापूर - प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0614942

वृत्त संग्रह

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697