निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू असून मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे मंगळवारीही ‘स्वाराती’ रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे.रॅली काढत निवासी डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले.‘स्वाराती’ रुग्णालयातील 172 निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी संपावर आहेत.
संपकाळात रूग्ण व्यवस्थेवर परिणाम झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल, अशा इशारा अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ राहुल मुंडे,उपाध्यक्ष डॉ प्रविण शेरखाने,सचिव डॉ अनुश्री कैन , अजित अरबट,महिला प्रतिनिधी डॉ जवेरीया शेख, प्रसिध्दी प्रतिनिधी डॉ सागर गवाणकर , डॉ शामली कोकाटे, डॉ.रुपाली वाघमारे,डॉ संतोष कसारे यांसह डॉक्टरांचा सहभाग होता.