महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली अर्पण केलीय. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केलेय.
यासंदर्भातील ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले की, महात्मा गांधींच्या पुण्यतिथीप्रसंगी मी बापूंना नमन करत आहे. आपल्या राष्ट्रासाठी शहीद झालेल्या सर्वांना देखील यानिमित्ताने आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आणि देशासाठी असलेले त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात.असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.