सुकन्या योजना ही एक भारत सरकारची वित्तीय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा मुलीच्या भविष्यातील विद्याप्राप्ती, उच्च शिक्षण, विवाह आणि उद्योजकता या सर्व गोष्टींसाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुख्यतः पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. याशिवाय तुम्ही सरकारी बँकांमधूनही या योजनेअंतर्गत खाते उघडून गुंतवणूक करू शकता. सध्या ही योजना तुमच्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याज देत आहे. वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता :
▪️ सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
▪️ सुकन्या समृद्धी योजना खाते फक्त मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतात.
▪️ खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे.
▪️ मुलीला एकापेक्षा जास्त खाते उघडता येत नाही.
▪️ कुटुंबातील फक्त दोन मुलींच्या नावे खाते उघडता येते.