इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये भारतीय संघात १७ सदस्यांचा समावेश आहे. सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
बीसीसीआयने म्हटले आहे की, महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली उर्वरित तीन सामन्यांसाठीही उपलब्ध नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो उर्वरित सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध नाही. तसेच आवेश खानला संघातून काढण्यात आले असून त्याजागी आकाश दीपची संघात निवड करण्यात आली आहे. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल यांना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर रहावे लागले होते. दरम्यान त्यांचे संघात पुनरागमन झाले असले, तरी वैद्यकीय विभागाने फिटनेसबाबत मंजुरी दिल्यानंतरच त्यांचा संघात सहभाग शक्य होईल. त्यामुळे जाडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील याबाबत अद्याप निश्चिती नाही.
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप