▪️येत्या 20 फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद राहणार
▪️विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी जाणार दोहाला; कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय बैठकी घेणार
▪️मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; जरांगेंची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास दिला नकार
▪️भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला, तर शहरातही विजांसह वादळी पावसाने लावली हजेरी
▪️नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे का? तेजस्वी यादव यांची टीका
▪️कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश
▪️भारतीय मूल्याधारित शिक्षण ही काळाची गरज; स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती कार्यक्रमात मोदींचे प्रतिपादन
▪️बहुचर्चित रामायण या चित्रपटामध्ये रणबीर कपूर साकारणार रामाची भूमिका तर अभिनेत्री साई पल्लवी ही सितेच्या भूमिकेत दिसणार