लातूरातील भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेतील कर्मचार्याच्या माणसिक त्रासाला कंटाळून सेवक नितीन बालवाड यांने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बँकेच्या पाच कर्मचार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, सन 2009 पासून नितीन बालवाड हे लातूर येथील भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेत सेवक यापदावर कार्यरत होता. गेल्या दोन महिन्यांपासून बँकेच्या इतर कर्मचार्यांनी केलेल्या अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात त्याचा कसलाही संबंध नसताना विनाकारण नितीन बालवाड यांना दोषी ठरविण्यात येत होते. आणि तुझ्यामुळेच हा घोळ उघडा पडला आहे. आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही असे केले. हे आम्ही वरीष्ठांना कळवू व तुझी नौकरी घालवू असे वारंवार धमकी देऊन टोचुन बोलायचे. त्यामुळे शांत स्वभाव असलेल्या नितीन यांच्यासमोर स्वताला निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी आत्महत्येशिवाय इतर कोणताच पर्याय ठेवला नाही.
नितीन बालवाड यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊ पांडुरंग अशोकराव बालवाड यांच्या फिर्यादीवरून 4 जानेवारी रोजी भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेच्या परळीकर मॅडम,पोलावार ,किरण डोईजड,वैभव राहटणीकर आणि पारले या कर्मचार्यांविरोधात लातूर ग्रामिण पोलीसात गुन्हा नोंद केला आहे. नितीन बालवाड याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली आहेत. पुढील तपास प्रतिभा प्रभाकर ठाकुर या करीत आहेत.