भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे परंतु मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
2019 साली संजयमामा शिंदे यांनी मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आणली होती पण त्यावेळी मोहिते पाटील परिवारांनी भाजपला दिलेल्या शब्दांनुसार माळशिरस तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तब्बल एक लाख 13 हजार इतके मताधिक्य दिले होते. त्यामतांच्या जोरावरच संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला होता.