समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. महामार्गावरील अपघातांचं प्रमुख कारण वाहनांचा वेग असल्याचं समोर आलं आहे. आता या दृष्टीने प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे.
समृद्धी महामार्गावर दर 10 किमीवर वाहनांचा वेग मोजणारं यंत्र बसविण्यात येणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आणि अपघातादरम्यान तत्काळ मदतीसाठी विशेष आयटीएमएस यंत्रणा देखील बसविण्यात येत आहे.
तसेच या मार्गावर प्रतितास 150 किलोमीटर वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. परंतु सद्य:स्थितीत या महामार्गावर प्रतितास 120 किलोमीटरची वेगमर्यादा आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसण्यास मदत मिळणार आहे.