सोलापूर : प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे, वय ३३ वर्षे, रा. ११७, अवंती नगर फेज-०१, जुना पुना नाका, सध्या सैफुल, विजापूर रोड, सोलापूर याचेविरुध्द सन २००९ ते २०२३ या कालावधीमध्ये, गैरकायद्याळी मंडळी जमा करुन दंगा करणे, जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करणे, अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.७७९/२०२४ दि.२१/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे, वय-३३ वर्षे, रा. ११७, अवंती नगर फेज-०१, जुना पुना नाका, सध्या सैफुल, विजापूर रोड, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.२२/०३/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.