रशियाची राजधानी मास्को येथे शुक्रवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा भारताने निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात 60 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तसेच 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी रशियाप्रती वचनबद्धता व्यक्त केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, दहशतवादी लष्कराचा गणवेश परिधान करून समारंभाच्या ठिकाणी घुसले होते.
यासंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दुःखाच्या प्रसंगी भारत रशियन फेडरेशनचे सरकार आणि लोकांच्या पाठीशी उभा आहे.काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियात झालेल्या निवडणुका जिंकून सत्तेवरची पकड आणखी मजबूत केली. अशा परिस्थितीत ही घटना त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
गेल्या दोन दशकांतील रशियातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी या हल्ल्याला मोठी शोकांतिका म्हटले आहे. रशियाची सर्वोच्च तपास यंत्रणा गोळीबार आणि स्फोटाच्या घटनेचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत आहे.अनेक रशियन प्रसारमाध्यमांनी या गोळीबाराचे वृत्त दिले आणि सांगितले की गोळीबारामुळे साइटवरील एका मॉलमध्ये आग लागली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये इमारतीच्या वरती काळ्या धुराचे मोठे लोट उठत होते.क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध रशियन रॉक बँड ‘पिकनिक’च्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी लोकांची गर्दी जमली असताना हा हल्ला झाला. या हॉलमध्ये 6 हजारांहून जास्त लोक बसू शकतात.