लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघडीने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेल आहेत. सोलापुरातही वंचित आपला उमेदवार देणार आहे. परिणामी येथे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची अडचण वाढू शकते. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीचे प्रयत्न केले जात होते. मात्र हे प्रयत्न यशश्वी ठरण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आम्ही महाराष्ट्रातील मतदारसंघांत आमचे उमेदवार उभे करणार आहोत, असे आंबेडकरांनी जाहीर केले आहे. त्यानंतर आता वंचितने सोलापूरची जागाही लढवण्याचे जाहीर केले आहे.
जागा लढवण्याची वंचितने तयारी केली आहे. सोलापूर मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा केली जात आहे. लवकरच या जागेवर उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे नेते राम सातपुते यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. हे दोन्ही उमेदवार तरुण असल्याने त्यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आत वंचित बहुजन आघाडीदेखील आपला उमेदवार देणार असल्यामुळे येथे तिरंगी लढत होणार का ? असे विचारले जात आहे.