जून रोजी विजयाचा भगवा रंग उधळून विजयोत्सव साजरा करू असा आत्मविश्वास राम सातपुते यांनी व्यक्त केला.पुन्हा एकदा राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेना टार्गेट केले आहे. ती सोलापूरची लेक नव्हे तर माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे. शिंदे परिवार खूप मोठं आहे, अशा भाषेत राम सातपुते यांनी पुन्हा एकदा प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेना टोला लगावला आहे.
सोलापूरच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सोलापूरची विमानसेवा सुरू करेन. सोलापुरात गारमेंट फॅक्टऱ्या कशा येतील यावर प्रयत्न करेन. विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. विरोधात असलेले प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्याबाबत कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करू द्या, मात्र मी खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेत टीका करणार नाही, अशी प्रतिक्रिया राम सातपुते यांनी दिली आहे.