सप्तशृंगी गडावर एक एप्रिल पासून इलेक्ट्रिक बस धावणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वनी येथील सप्तशृंग गडावर विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. आतापर्यंत या ठिकाणी डिझेल बसच्या माध्यमातूनच गडावरती जाता येत होते.
याशिवाय खाजगी वाहतूक होत होती. पण आता परिवहन महामंडळाने सप्तशृंग गडावर आज 1 एप्रिल पासून एसटी महामंडळ इलेक्ट्रीक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ ही बस सेवा सुरू करीत असुन सकाळी 5 ते सायंकाळी 6.15 पर्यंत ही बस जुने सीबीएस येथून सुटणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रथमच इलेक्ट्रिक बस धावणार आहे. आत्तापर्यंत पुण्याहून नाशिकला येणारी बसच जिल्ह्यात इलेक्ट्रिक बस धावत होती.