नाशिक दिंडोरी रोड वरील ढकांबे या गावाजवळ सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या बलोरो गाडीला भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील वणीच्या असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी गडावरील भाविक दर्शन घेऊन खाजगी बोलेरो क्रमांक एमएच 15 जीआर 4105 या गाडीने नाशिककडे येत होते. दिंडोरी तालुक्यातील आणि नाशिक जवळ असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठापुढील दखांबे या गावाजवळ जीप चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही जीप होंडा शाईन गाडी क्रमांक एमएच 15 एचएम 3536 या गाडीवर जाऊन धडकली. शाईन गाडी ही नाशिकहून दिंडोरीकडे चालली होती. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाला आहेत. दुचाकीस्वार असलेले दोन्हीही मृत्यूमुखी पडले असून ते येथीलच जवळ असलेल्या शिंपी गवळी या गावातील होते. अपघातात द्राक्ष व्यापारी राकेश यादव, मुकेश यादव यांचेसह पाच जण ठार झाले आहेत. तर तीन जखमी आहेत.