वकिलांच्या बार असोसिएशनसाठी २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून त्यातून २०२४-२५ या वर्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. आतापर्यंत २८ वकिलांनी अर्ज खरेदी केले असून त्यापैकी नऊ जणांनी अर्ज भरले आहेत. यंदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.सोलापूर बार असोसिएशएनसाठी यंदाच्या निवडणुकीत एक हजार ८३१ वकील सदस्यांनी नोंदणी केली आहे.
गतवर्षीच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड यांनी बाजी मारली होती. यंदाची निवडणूक चौरंगी होणार असल्याने अर्जांची संख्या देखील वाढू शकते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.