महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जाहीर मेळावाच्या पोस्टरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आले. तर मेळाव्यातील स्टेजवर महायुतीमधील सर्वच पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. यात मधोमध मनसे झेंडा लावण्यात आला होता. त्याला लागूनच भाजप पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता. याचा फोटो समोर आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले होते. भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जाहीर मेळावाच्या पोस्टरवर आणि बॅनरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आले. हे पोस्टर व्हायरल झाले होते.
मेळाव्यातील स्टेजवर महायुतीमधील सर्वच पक्षांचे झेंडे लावण्यात आले होते. यात मधोमध मनसेचे इंजिन असलेला झेंडा लावण्यात आला होता, लागूनच भाजप पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता, तर आजूबाजूला महायुतीमधील इतर पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. याचा फोटो समोर आला आहे. भाजपकडून मनसेला मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
तसेच ठाणे जिल्ह्यात आणि जिल्हातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात मनसेचा मतदार आणि राज ठाकरे यांना मानणार वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघात सुमारे सव्वा लाख ते दीड लाख मते मनसेची आहेत. त्यामुळे मनसेचे मतदान आपल्या पारड्यात पडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचे बोलले आहे. असे असलेही तरी मनसे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराला सपोर्ट करणार का आणि पाठिंबा देणार का? हे पहावे लागेल…
मुरबाड तालुक्याची राजकीय ताकद एकाच व्यासपीठावर
मुरबाड तालुक्यात स्थानिक पातळीवर भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सुभाष पवार यांची राजकीय ताकद मोठी आहे. मनसे आणि रिपब्लिकन पक्षाचेही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. महायुतीच्या आजच्या मेळाव्यात ही ताकद एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाली.
ऊंची छलाँग लगाने के लिए
गुढीपाडाव्याच्या मुहुर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सभा घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. नरेंद्र मोदींसाठी आम्ही भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी या सभेत स्पष्ट केले. त्यावर मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनीही सोशल मीडियाद्वारे “ऊंची छलाँग लगाने के लिए चिता भी दो कदम पीछे आता है” अशा आशयाची भूमिका स्पष्ट केली आहे.