शिवसेनेच्या फायरब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या ‘मटा कॅफे’ या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली असली-नकली शिवसेनेची टीका, संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींविषयीचं केलेलं वक्तव्य, भाजप खासदार रामदास तडस यांच्या कुटुंबीयांवर सुनेने केलेले गंभीर आरोप, महाविकास आघाडीतील जागावाटप, वर्षा गायकवाड यांची नाराजी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका यासारख्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. राज ठाकरेंविषयी अप्रत्यक्षपणे भाष्य करणारं ‘इंजिनदादा इंजिनदादा काय करता?’ हे बडबडगीत सुषमा अंधारेंनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कविताही रचतात. यावेळी त्यांनी लहान मुलांचं बडबडगीत विडंबनात्मक पद्धतीने सादर केलं. माझी मुलगी लहान आहे, तिने पार्कमध्ये खेळताना कुठेतरी ऐकलेली कविता आहे, असं सांगत त्यांनी ‘इंजिनदादा इंजिनदादा काय करता?’ ही कविता सादर केली.
सुषमा अंधारे यांनी सादर केलेली विडंबनात्मक कविता, वाचा जशीच्या तशी
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
पुड्या मी सोडतो, तुम्हा बनवतो, थापा मी मारतो, नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
ब्ल्यू प्रिंट आणतो, पीपीटी करतो, घोषणा करतो, नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
खट्यॅक करतो, पाट्या मी फोडतो, टोलनाक्यावर जातो, नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
बृजभूषणला घाबरतो, भैयांना चोपतो, धमक्या मी देतो, नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
शुकशुक मी करतो, डोळा मी मारतो, भानगडी करतो, नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
पार्कात जातो, गर्दी जमवतो, वल्गना करतो, नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
मांडवली करतो, पाठिंबा देतो, बिनशर्त म्हणतो,
सुखात नाहतो नव्या नव्या, सुखात नाहतो नव्या नव्या
इंजिनदादा इंजिनदादा काय करता?