राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर पोहोचले आहेत.
शिवरत्न बंगल्याच्या गेटवरच नंदिनी देवी मोहिते पाटील आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने शरद पवार आणि शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.


सोबत शेकापचे जयत पाटील, माजी आमदार नारायण पाटील, अभिजित पाटील, धनाजी साठे, अनिकेत देशमुख, सुरेश हसापुरे, काका साठे, माजी आमदार रामहरी रूपनवर, चेतन नरोटे, शिवाजी कांबळे, उमेदवार धैर्यशील मोहीते पाटील यानी सर्वाचे स्वागत केले.
शिवरत्न वर सध्या या सर्व नेत्यांची बैठक सुरू असून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती घेण्यात येत आहे. मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते सांगत आहेत की सध्या नरेंद्र मोदी यांची हवा संपलेली आहे, त्यामुळे सोलापूर लोकसभेमध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चित निवडून येतील असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
या बैठकीला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील शेजारी अनुपस्थित असले तरी त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव शिवराज सिंह मोहिते पाटील हे मात्र उपस्थित आहेत. आत मध्ये या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू असून बाहेर शिवरत्न परिसरात हजारों कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.