सलग सहाव्या दिवशी शनिवारीही अवकाळी पावसाने झोडपून काढले. विदर्भात मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला.
सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. रविवारीही विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी पहाटेही मराठवाडा, विदर्भासह जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला.