मागील पाच वर्षापूर्वी ज्यांना तुम्ही (अमोल कोल्हे) निवडून दिले. त्यावेळी त्यांच्या (अमोल कोल्हे) सभांना अनेक ठिकाणी आलो आहे. परंतु पाच वर्षाच्या मध्येच डॉ. अमोल कोल्हे मला म्हणायला लागले. दादा मला राजीनामा द्यायचा आहे. माझं काम खासदारच नाही. दादा मी सेलिब्रेटी असून मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी अभिनेता, मालिकेत काम करणारा कलावंत आहे. त्यामुळे माझ मोठं नुकसान होत आहे, असा किस्सा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला.
शिरुर लोकसभेचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याला उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.