सोलापूर सुरक्षा विभागाने रेल्वेत चोरी करणारे व छेडछाड करणाऱ्या ४१ जणांवर अटकेची कारवाई केली आहे. तर, चालत्या रेल्वेगाडीतून चढ-उतार करताना तोल गेलेल्या सहा पुरुषांचे आणि दोन महिलांचे जीव वाचविले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त दीपककुमार आझाद आणि सहायक आयुक्त दिनेश कनोजिया यांच्या देखरेखीखाली रेल्वे सुरक्षा विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात चोरी आणि छेडछाड असे एकूण ३९ घटना झाल्या होत्या. त्यातील ४१ जणांवर अटकेची कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच चालत्या रेल्वेमधून उतरताना आणि चढताना पडणाऱ्या सहा पुरुषांचे आणि चार महिलांचे जीव वाचविण्याचा यश आले. रेल्वेत हरविलेल्या तीन पुरुष आणि सात महिलांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले. यासह रेल्वेची मालमत्ता परत मिळविणे. हरविलेल्या मुलांना सुरक्षितरित्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे कामही सुरक्षा विभागाकडून केले आहे.