सोलापूर शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. तिच्याशी केलेल्या अत्याचारातून अपत्य जन्मले. पोलिस रेकॉर्डवरील गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी सुरत येथून पीडिता आरोपीला रविवारी सोलापुरात आणण्यात आले. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीविरुद्ध अत्याचारासह लैंगिक छळ, बालविवाह कायद्यान्वये गुन्हा फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंदला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज दीपचंद्र कश्यप (वय २०, रा. संजय नगर, निलगिरीनगर मराठा हायस्कूल, सुरत, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पीडित फिर्यादी ही १५ वर्षांची असून, नमूद आरोपीने तिला ४ जून २०२३ रोजी फूस लावून येथून पळवून नेले होते. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी तेव्हा तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला होता. हा गुन्हा तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.
त्यानुसार पथकाने पीडित निर्भया हिचा शोध घेऊन मराठा हायस्कूल, सुरत गुजरात येथून ताब्यात घेतले. रविवारी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजर केले. पीडित निर्भया हिने दिलेल्या जबाबानुसार नमूद आरोपीचे व पीडितेचे प्रेमसंबंध जुळले. याबद्दल नातलगांना समजल्यानंतर त्यांनी समज दिली. हे संबंध घरच्यांना मान्य नसल्याने पीडिता व आरोपी दोघांनी पुणे गाठून तेथून राजकोट (गुजरात) गाठले. तेथे गेल्यानंतर दोघांनी २१ जानेवारी २०२४ रोजी लग्न केले. यापूर्वी त्यांचे संबंध आले होते.यातून दोघांचे संबंध जुळल्याने २८ मार्च २०२४ रोजी त्यांना अपत्य जन्मास आले. या प्रकाराची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी निर्भयासह आरोपी अशा दोघांना शनिवारी सोलापुरात आणले. रविवारी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजर करून पीडितेच्या जबाबानुसार अत्याचार, बाल लैंगिक छळ तसेच बालविवाह कायद्यानुसार गुन्हा नोंदला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एमा राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत, फौजदार अश्विनी काळे, सहा फौजदार राजेंद्र बंडगर, अलका शिपूरे पोलिस अंमलदार सत्तार पटेल, दाद गोरे, सायबरचे अविनाश पाटीला प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली.
अनैतिक मानवी वाहतूक पथकाच्या वतीने गेल्या वर्षभरात हैद्राबाद येथून दोन, कर्नाटकासह महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद येथून प्रत्येकी १ अशा अल्पवयीन मुलींना घटनास्थळी जावून आरोपींसह ताब्यात घेण्यात आले. अशा घटनांमध्ये पळून गेलेल्या पालकांची भावनिक स्थिती जाणून घेऊन पक्षाकडून त्याचा छळ लावण्याचा प्रयत्न केला जातो.
पीडित मुलीला पळवून नेल्याबद्दल ५ जून २०२३ रोजी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदलेला होता. पोलिसांनी शोध न लागल्याने हा गुन्हा तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे २३ नोव्हेंबर २०२३ रोजी वर्ग केला होता. त्यानुसार या पथकाकडून तपासाची पुढील दिशा ठरवून मोबाईलच्या मदतीने संबंधित पीडित व आरोपी गुजरातमध्ये असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सूरत येथील नीलगिरी नगर येथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले.