राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक ही भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते बारामतीच्या तांबे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.यावेळी अजित पवार यांनी देशाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगितले.
140 कोटी जनतेचा नेता हा खमका असला पाहिजे. आमचा नेता नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सांगतोय की मोदी पंतप्रधान होणार, आमच्या विरोधकांनी कोण पंतप्रधान होणार हे सांगावं. बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत कमी पडला आहे का ? केंद्राचा निधी मोठा मिळत असतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षात राज्यात केंद्राचा निधीच आला नाही. विकासासाठी निधी देण्याची धमक अजित पवारांमध्ये आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.