खासदाराचे काम काय असते तर लोकसभेत चर्चा घडवून केंद्राच्या योजनेअंतर्गत मोठा निधी मतदारसंघासाठी आणायचा असतो आणि प्रश्न मार्गी लावायचे असतात. आम्ही मराठवाड्यासाठीच्या हक्काच्या ३३ टीएमसी पाण्यासाठी ५० हजार कोटींची योजना आखली असून शेती, उद्योग, बेरोजगारांना काम मिळणार आहे.तुमच्या बार्शीसाठी खासदाराने काय केले? बाळ किती गुणी आहे सांगायची गरज नाही? असा टोला खासदार ओमराजे निंबाळकरांना तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लगावला.
येथील स्टेशन रोडवर माऊली मंगल कार्यालयात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार पाटील बोलत होते. व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत, विक्रम काळे, माजी खासदार शिवाजी कांबळे, बाजार समिती चेअरमन रणवीर राऊत उपस्थित होते.