वेल्फेअर फाउंडेशन तर्फे आयोजित मंथन राज्यशोध प्रज्ञा परीक्षा या दरवर्षी घेतल्या जातात. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडीयम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या मंथन परीक्षेमध्ये यशाची उंच शिखरे गाठली आहेत.
मोहिते पाटील प्रशालेतील विद्यार्थी नेहमीच सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असतात मग ते कला, क्रीडा किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये या शाळेचे विद्यार्थी सातत्याने चमकतातच.
सन २०२३-२४ यावर्षीच्या मंथन परीक्षेमध्ये प्रशालेतील इयत्ता दुसरीच्या कु. श्रीशा विजयकुमार धायगोंडे केंद्रात प्रथम, कु.समर्थ रामचंद्र देवकते केंद्रात दुसरा, कु.खुशी अमोल शेवडे केंद्रात तिसरी त्याचप्रमाणे इयत्ता तिसरीची आरुषी महेश माळी ही केंद्रात दुसरी आली आहे. चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये शयान असिफ शेख हा देखील केंद्रात दुसरा आला आहे. तसेच पाचवी मध्ये मल्लिकार्जुन चिदानंद स्वामी केंद्रात प्रथम व प्रणिती चिदानंद स्वामी केंद्रात दुसरी आली आहे इयत्ता सहावी मध्ये साईराज ज्ञानोबा चव्हाण केंद्रात प्रथम व अरीन वसीम अत्तार केंद्रात दुसरा आला आहे. अशाप्रकारे एकूण नऊ विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या मंथन परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांबरोबरच शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. प्रशाले कडून मंथन स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता यावे यासाठी खास तासिकांचे नियोजन करण्यात आले होते त्याचा परिणाम वरील विद्यार्थ्यांच्या यशातून दिसून आला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार यांनी भरभरून कौतुक केले. तसेच संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ सर्वेसर्वा डॉ. पुष्पांजली शिंदे व राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.