सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम २५ मे आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी –
१) सुमेर असोसिएट्स (एच पश्चिम विभाग) – १३५ कोटी ५१ लाख ३२ हजार ६६४ रुपये
२) सुमेर बिल्ट कॉर्पोरेशन प्रा. लि. (ई विभाग) – ७७ कोटी ०६ लाख ११ हजार ७१३ रुपये
३) अशापदारा डेव्हलपर्स (एच पूर्व विभाग) – ४४ कोटी ०४ लाख ३८ हजार २६ रुपये
४) महाराष्ट्र थिएटर्स (एच पूर्व विभाग) – ३८ कोटी ७० लाख ६३ हजार ६५५ रुपये
५) एकतानगर गृहनिर्माण संस्था (आर दक्षिण विभाग) – ३४ कोटी ९९ लाख ८५ हजार ४५३ रुपये
६) सखाराम महादेव पाटील (एच पश्चिम विभाग) – २३ कोटी ८७ लाख ७३ हजार ४८ रुपये
७) आर. आर. डेव्हलपर्स (टी विभाग) – १९ कोटी ९६ लाख ४१ हजार ६३२ रुपये
८) नंदनबाला कमर्शिअल्स प्रा. लि. (डी विभाग) – १६ कोटी ७१ लाख ८६ हजार ६४० रुपये
९) द व्हिक्टोरिया मिल्स लिमिटेड (डी विभाग) – १५ कोटी ४७ लाख ९३ हजार ७६ रुपये
१०) ओबेरॉय रिअॅलिटी लिमिटेड (पी दक्षिण विभाग) – १२ कोटी ८४ लाख ५५ हजार ६६३ रुपये.