आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील नरसिंग गिरजी मिल येथील हनुमान मंदिरामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. या प्रसंगी आरती करत सोलापूरकरांच्या वतीने संकटमोचक मारुतीरायाला सर्वांचे दुःख दूर होवो आणि घरोघरी सुख – समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरकरांसाठी फक्त वर्षातून एकदाच म्हणजे फक्त हनुमान जयंतीच्या दिवशीच दर्शानासाठी खुले असते. अशा या मंदिरात मारुतिरायांचे दर्शन घेण्यासाठी आज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यादरम्यान “जय श्री राम” ह्या घोषणांनी तेथील परिसर हनुमंताच्या भक्तीमध्ये लिन झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सातपुते यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नागेश खरात, रोहित खताळ, अजय यादव, अक्षय कोथिंबीरे, विनोद वाघमोडे, अनु क्षीरसागर, सुमित चव्हाण व तेथील माता-भगिनी व भक्तगण उपस्थित होते.