राज्यातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले असून सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर असून माढा लोकसभा मतदारसंघात त्यांच्या सभा होत आहेत. सोलापुरात माजी मुख्यमंत्र्यांची कन्या प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे, या लढतीकडे सर्वच राजकीय पक्ष गंभीरतेने घेत आहेत. आमदार प्रणिती शिंदेनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती, तर अद्यापही सभांच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल कर आहेत. मात्र, सभेदरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पुलवामा हल्ल्याचा दाखला दिला. आता, याच विधानावरुन प्रणिती शिंदे अडचणीत आल्या आहेत. कारण, भाजपाने निवडणूक आयोगाकडे प्रणिती शिंदेंच्या विधानाची तक्रार केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...