अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिलला झालेल्या मतदानासाठी ८ विधानसभा मतदारसंघांतील २६७२ मतदान केंद्रांपर्यंत पोलिंग पथक, साहित्य पोहोचविण्यासह त्यांना परत आणण्याची कामगिरी २९५ एस.टी. बसद्वारे पूर्ण करण्यात आली. पहाटे ४ वाजेपर्यंत पोलिंग पथकांना एस.टी.ने शहरात परत आणून सोडले. दरम्यान, एस.टी.ला दोन दिवसांत १ कोटी १ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी साहित्य व पोलिंग पथक पोहोचवण्याचा अमरावती विभाग नियंत्रक कार्यालयाकडे जिल्हा निवडणूक विभागासोबत करार केला होता. त्यासाठी किमान १५ हजार रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. कमी जास्त अंतरानुसार, त्यात वाढही झाली. – अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघात १९८३ व वर्धा लोकसभा मतदारसंघातील • जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार . संघात ६८९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण १२हजार २३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. आदिवासी बहुल क्षेत्रातील १३६ मतदान केंद्रांवर पोलिंग पथकांना अचलपूर येथून २५ एप्रिलला रवाना केले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना दिवसातून दोन ते तीन फेऱ्या करून २९५ एस.टी.ने मतदान केंद्रांवर पोहोचविले तसेच परतही आणले.
२९५ बस केल्या होत्या आरक्षित
निवडणुकीच्या कामासाठी पोलिंग पथक पोहोचविण्यासाठी २९५ तसेच सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना पोहोचविण्यासाठी ३५ एस. टी. बस आरक्षित केल्या होत्या. २२ ते २७ एप्रिलपर्यंत ३५ बस पोलिस बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांकरिता आरक्षित केल्या होत्या. आता सर्वच बस अमरावती विभागात परतल्या असून, बाहेरून मागवलेल्या बसही परत पाठवल्याची माहिती स्थानिक एस. टी. प्रशासनाने दिली आहे.