आज नाशिकच्या तापमानात घट होऊन पारा दोन अंशांनी घसरला आहे. तर नाशिक कॅलिफोर्नियात आजही पाच अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज नाशिक शहरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये आज पुन्हा 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा असल्याने सकाळी नऊपर्यंत घराबाहेर निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. अशातच आज पुन्हा पारा खाली गेल्याने नाशिकसह जिल्ह्याला हुडहुडी भरली.नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून मागील चार ते पाच दिवसांपासून हुडहुडीने वेढा घातला आहे. ढगाळ वातावरणाने काढता पाय घेतल्यानंतर आता थंडीचे आगमन झाले असून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली आहे.