देशात सध्या लोकसभा निवडणुकींची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. मोदींनी आजवर केलेल्या कामाची आकडेवारी व देशाची प्रगती याचे आकडे लोकांसमोर पुराव्यासह दिले आहेत. त्यावर वृत्तवाहिन्या व मोदी ऍप वरून कायम माहिती मिळत असते. साधे उदा. द्यायचे झाले तर महाराष्ट्रातील नुकताच बांधला गेलेला अटल सेतू, मुंबई मेट्रोचे जाळे, देशात उभारलेले विक्रमी हायवेज, रेल्वेचे झालेले बदल, एम्स हॉस्पिटल्स व कॉलेजेस, आयआयटी पासून अनेकविध योजनांची उदा. देता येतील.. सैनिक मेमोरियल, सीमेवर रस्ते बांधणी, सीमेचे सशक्तीकरण, डिफेन्स उपकरण यांचे उत्पादन, सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० व राम मंदीर उभारणी हे राष्ट्राचे मानबिंदू ठरलेले आहेत. भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात सर्व आलेले आहेच पण मोदींच्या कामाचा लेखाजोखा सर्वत्र उपलब्ध आहे. पूर्वी पद्म पुरस्कार हे विशिष्ठ घराणी व देशातील प्रतिष्ठित व्यक्तींना दिले गेलेले आपण पाहिले असतील आज हे पुरस्कार तळागाळात काम करणाऱ्या लोकांना दिले गेलेत त्यात कुठला धर्मभेद पाहिलेला नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी सरकार मधील एकाही व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. शेअर बाजाराचे महत्व जागतिक बाजारपेठेत न भूतो न भविष्यती वाढले आहे. मोदींनी देशासाठी न थकता काम करण्यात सातत्य ठेवलं आहे. एकही आरोप कोर्टात सिद्ध झालेला नाही उलट आरोप करायला गेलेल्या लोकांना माफी मागावी लागली. उदा. राफेल बाबत राहुल गांधी. सत्याचा आव आणणारा इंडी आघाडीचा सदस्य केजरीवाल जेल मध्ये गेला आणि बाहेर येत नाही म्हणजे केस मध्ये मेरिट आहे. आरोपात तथ्य आहे. पण त्याउलट सतत हे दिसून येते की विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करतो जे कोर्टात टिकू शकत नाहीत व बदनामी करण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करतो. खोटे मेसेजेस टाकतो ज्याला काही ब्रँडेड वृत्तपत्राच्या बातमीचा आधार नसतो. ना कुठल्या गोष्टीची किनार असते.
राज्यात बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे यांचे उरलेले कार्यकर्ते भाजप बाबत मनुवादी कावा व ही संविधान वाचवायची लढाई आहे अस भाषणातून म्हणू लागले आहेत. ते स्वतः तर पक्षाची अस्तित्वाची लढाई कोर्टात निम्मी हरले आहेत. त्यांची निशाणी व पक्ष शिंदेंनी हातातून खेचून नेला आहे. त्या कार्यकर्त्यानी परवलेल्या विक्रमी अफवांची तर गिनीज बुकात नोंद करावी इतके ते खोटे ठरले आहेत. देशभरात जे चोर एकत्र आले त्यांच्या टेम्पोत हे संस्कार विसरून जावून बसले. निवडणूक आली की अजून एक मुद्दा जोर धरतो तो म्हणजे मोदी व शहा हे गुजराती असून त्यांना मुंबई ही आर्थिक राजधानी गुजरातला न्यायची आहे. सारासार विचार केला तर हे कुर्ल्याची लोको शेड कर्जतला येणार आहे इतके सोपे आहे का? जेव्हा हे मुंबई महापालिकेत सत्तेत होते तेव्हा यांनी परप्रांतीय लोकांना रेशन कार्ड दिले नाही का? यांच्या काळात बांगलादेशी घुसखोर आले नाहीत का? मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला तो काय अबू आझमीने कमी केला?
विरोधी पक्षाकडे सर्वांत महत्त्वाचं सद्याच हत्यार आहे अफवा पसरवणे व लोकांना घाबरवणे व त्यात भक्त मात्र पिछाडीवर आहेत. आमचे उजवे फक्त कायदेशीर आधार असलेल्या बातम्या छापतात. काय चुकीचे काय बरोबर यावर साधक बाधक चर्चा करतात. राष्ट्रवादीला सोबत घेतले म्हणून नाराजीचा सुर जाहीरपणे आणतात. आरे ही राष्ट्राची निवडणूक आहे जिथे परस्पर विरोधी असलेले शेकडो पक्ष बेरजेच्या गणितासाठी एकत्र येऊ शकतात तिथे एक राष्ट्रवादी सोबत आली तर कुठे बिघडले? तुम्ही स्थानिक पक्षाला नाही तर मोदींना मतदान करत आहात. त्यांच्या अफवांना बळी न पडता आता सत्यवादी स्वभाव आड येतो आहे तर हे चुकीचे आहे. काही लोकसभा निवडणुकीत पांढरपेशी विद्वान निवडणुकीत मतदान करायला गेले नाहीत हे सर्वाधिक घातक आहे. या सर्व लोकांच्या केंद्रस्थानी नेतृत्व भाजपचे आहे हे लोक विसरले. मेहबूबा मुफ्ती सोबत घेऊन भाजपने ३७० हटवले. त्यामुळे युतीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करायला हवे. तुमच्या तत्वामुळे येणाऱ्या पिढ्यांचे अपरिमित नुकसान झालं तर पश्र्चाताप करण्यासारखं दुसर काही नसेल.
अजून एक महत्वाची अफवा इंडी आघाडी अशी पसरवत आहे की मोदी सरकार जाणार आहे म्हणून गुप्तचर विभागाचा अहवाल असल्याने व ग्राउंड रिपोर्ट असल्याने प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या अनेक अधिकारी व्यक्ती यांनी त्यांच्या राज्यात जायचे अर्ज केले आहेत. या बातमीला काही आधार ना आगा न पिच्छा. घरी बसून सरकार चे १०० खोके दर महिन्याला मोजणाऱ्या व्यक्तीचे समर्थक या पुड्या सोडत आहेत. हिंमत असेल तर अशी बातमी ब्रँडेड वृत्तपत्रात छापून आणा. सामान्य माणसांनी जेव्हा मोदी व मनमोहन सिंग यांची तुलना करणारी बातमी छापून येते तेव्हा ती बातमी कुठल्या पुराव्याचे आधारावर व कोणत्या न्युज माध्यमात येते त्याचा ब्रँड चेक करावा. कुठले व्हॉट्स अप मेसेज व पादरे पोर्टल यावर काडीचा विश्वास ठेवू नये.
अजून एक महत्वाची अफवा आरक्षण हटवण्याबाबत पसरते जे आरक्षण कोर्टात वैद्य ठरत ते आरक्षण कायद्याने हटू शकत नाही. मोदींनी आरक्षण म्हणून गरीबांना धान्य दिलेलं नाही. जे धान्य अडवून व सडवून दारू बनवण्यासाठी मुद्दाम पाठवल जायचं ते आज गरिबाच्या पोटात जात आहे. देशातील गोदाम उंदरांनी भरलेली होती ती आज सुरक्षित आहेत. प्रत्येक घरी आज जलजिवन मिशन चे नळ आणि ग्रामीण भागात शौचालय पोचले. जो राहुल गांधी लोकांच्या खात्यात पैसे टाकायचे म्हणतो आहे ती खाती सुद्धा काँगेस काळात नव्हती ती खाती बिना पैश्यात मोदी सरकारच्या काळात उघडली गेली आहेत.
नुकताच पुण्यातून एका इस्लामिक संस्थेने जाहीरपणे इंडी आघाडीला त्यांच्या धर्माच्या व्यक्तींना बोलवून पाठींबा दिल्याचा व्हिडिओ फिरतो आहे. याकूब मेमन मेमोरियल बांधण्याचे ज्यांनी स्वागत केले त्या व्यक्तींना हा पाठींबा साहजिक आहे पण हे ही लक्षात घेऊन काही लोक अफवांना भुलले आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल म्हणून निषेधाने मतदान करायला नाही गेले तर त्यांना पुढच्या पिढ्या माफ करू शकत नाहीत याचे भान असायला हवे. ज्यांच्यात विस्तव जात नव्हता अशा व्यक्ती एकत्र का आल्या? याचे कारण त्यांना मोदींच्या व्हिजन ची भीती झाली. त्यांना जेल मध्ये जायची भीती झाली. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून ही अभद्र युती पुढे आली.
इंडी आघाडीत महराष्ट्रातील असे दोन माजी मंत्री आहेत जे जेल मध्ये होते. ते अजून निर्दोष सुटलेले नाहीत. जामिनावर बाहेर आहेत. अजून एकही व्यक्तीला क्लीन चिट दिल्याची बातमी बाहेर आलेली नाही. मिळणार देखील नाही. उलट त्यांच्यातल्या नेत्यांचे वक्तव्य पाहा. ते विकास व भ्रष्टाचार विषयात काय बोलतात? ते आम्ही घरी का बसून कारभार करत होतो त्यावर बोलतात? आमचे पक्ष हातातून का गेले त्यावर बोलतात? केजरवाल सुटत का नाही त्यावर बोलतात?
शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना चिडले. म्हणाले हा छोट्या कुटुंबातला व छोट्या समाजाचा मुलगा त्याला आम्ही जी मदत केली त्याची जाण राहिली नाही. छोटे कुटुंब व छोटे समाजाचे लोक नेतृत्व करू शकत नाहीत?
इंडी आघाडीने अजून एक चमत्कारिक काम केलं आहे ते म्हणजे एक्झीट पोल वाढून चडवून दाखवणे. हे कुठून होते? अशाच प्रकारचे पोल्स मध्ये पाच राज्याच्या निवडणुकीत यांच्याच बाजूने आलेले. हे लोक मात्र त्या निवडणुका हारले. सर्वत्र भाजप सरकार अल. फक्त पंजाब मध्ये सक्सेस ठरले. त्यामुळे याच्यावर किती विश्वास ठेवायचा ते जनतेने लक्षात घ्यावं. सोशल मीडियावर होणारे मतदान गावातील जनता करत नाही. व ही सामान्य जनता जागरूकतेने अजून पुढे गेलेली आहे. त्यांच्यापर्यंत गरीब कल्याणच्या योजना पोचल्या आहेत. किसान सन्मान निधी मिळतो आहे.
जागरूक नागरिक यांचे अजून एक चुकते हे नागरिक मतदानाला न जाता देशातील सिस्टीमलां शिव्या देतात. त्यानी मतदानाला बाहेर पडावं. देशात गेल्या दहा वर्षात बदल घडलेला आहे. त्याचे साक्षीदार व्हावं व भारताला पुढील १०० वर्ष सक्षक्त करण्या करिता आपण मोदींना मतदान करून योगदान द्यावं. युतीच्या कार्यकर्त्यांनी अफवा पसरविणारे मेसेज दिसले की त्याची खबर निवडणूक आयोगास पुराव्यासह ईमेल करून द्यावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाऊन कारवाई होते.
देशात मोदींचीच हवा आहे. महाराष्ट्र राज्यात तर सकारात्मक वातावरण आहे. इंडी आघाडी अफवा पसरवत आहे त्याचा सर्वांनी कायदेशीर बीमोड करावा. आपण मतदान करावे व दुसऱ्यांना यांच्या अफवांचा व फतव्याचा दाखला द्यावा. सर्वांचे मतदान करूनच १०० कोटी वसुली व जातीयवादी दंगली घडवणाऱ्या लोकांपासून आपण राज्याचे रक्षण करू शकतो.