केंद्र सरकारने लोकसभेच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठवून बळीराजाला मोठे गिफ्ट दिले. तब्बल चार महिन्यांनंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र कांद्यावरील निर्यातबंदी हटली तरी शेतकऱ्यांची क्रुरचेष्टा मात्र सुरूच आहे. सोलापूरात एका शेतकऱ्याला एका एकरातील कांदा विकून फक्त ५५७ रुपये हाती लागलेत. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे.सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे मारोती खांडेकर यांनी एका एकरात कांद्याचे पीक घेतले होते. एका एकरात त्यांनी २४ पाकीट कांदा लावला होता. कांदा लागवड, मशागतीला त्यांनी जवळपास ५८ हजार रुपये आला होता. कांदा काढणीला आल्यानंतर त्यांनी काल सोलापूर मार्केट समितीत विक्रीला नेला होता.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...