सोलापुरात एक दुर्दैवी घटना घडली असून एक आठ वर्षाचा बालक डंपर खाली येऊन मृत्यूमुखी पडला. हा अपघात नई जिंदगी भागात घडला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नाही जिंदगी नागनाथ नगर येथून कुंभारी रस्त्यावर ही घटना घडली. असद गौस शेख वये वर्षे 8 असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
तो हैद्राबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजी कडे आला होता. आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळतात पोलीस दाखल झाले त्यांनी बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे हरवला.