अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या छोरी २ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. याचा एक व्हिडिओही नुसरतच्या को-स्टारने शेअर केला आहे. नुसरतच्या डोक्याला टाके पडल्याची माहिती आहे. अपघातादरम्यान नुसरत भरुचासोबत इशिता राज ही तिची को-स्टार होती. तिने नुसरतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर नुसरतने हीच पोस्ट आपल्या टाइमलाइनवर शेअर करत चाहत्यांना तिच्या अपघाताची माहिती दिली.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...