राज्याभरात उद्यापासून (बुधवार) पोलीस भरती सुरू होणार आहे. विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये एका पदासाठी सरासरी सुमारे १०१ अर्ज आले आहेत. एकूण १७हजार ४७१ पदांसाठी १७.७६ लाख अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टर्स, इंजिनीयर, वकीलीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश असून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण ४०% हून अधिक आहे. महाराष्ट्रातल्या हीच भीषण बेरोजगारी अधोरेखित करताना राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी राजकीय पक्षांसाठी ‘चिंतन’ ट्विट केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर मात्र आज जोरदार चर्चा होतेय. मात्र बेरोजगारीवर चर्चा होत नाही. ? इंजिनियरिंग, डॉक्टरकी, वकिली सारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेटत नाही म्हणून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवांची की युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.