वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक, राजकीय चाणक्य, धुरंदर नेते शिवलिंगप्पा करबसप्पा कोडले यांनी दि.१२ जानेवारी सायंकाळी ०४.०० वा.देह त्याग केले. वळसंग गावाचे २१ वर्ष सलग सरपंच होते. त्याचवेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष पद १५ वर्ष सांभाळले.जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटी सदस्य, वळसंग सिद्धेश्वर ट्रस्टचे चेअरमन असे अनेक पद भूषविले होते. गावातील तंटा मिटवणे, गरिबांचे अडीअडचणी सोडवणे, रखडलेली सरकारी कामे सुरळीत करणे अशा प्रकारे अनेक कामे केले होते.
मा. शरद पवार यांचे कट्टर समर्थक, माजी आमदार कै. आनंदराव देवकते यांचे उजवा हात म्हणून ओळखले जाणारे चाणक्य नेता शिवलिंगप्पा कोडले यांनी वृद्धापकाळाने वयाच्या ८२ वर्षी निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी ,तीन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे. या नेत्याचे अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक १३ जानेवारी रोजी दुपारी ०१.०० वा. राहत्या घरापासून निघणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...