उमरी प्रतिनिधी. उमरी येथील महेश कृषी सेवा केंद्रात किसान हे बोगस खत शेतक-याना विक्री करीत असताना नांदेड येथील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गळ्यातील दुकानावर धाड टाकून किसान बोगस खताचे पोते जप्त करुन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिराशे यांना बोलावून पंचनामा करण्यात आला असून खताचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असून विक्री बंदचे आदेश देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी दिली आहे.
उमरी शहरात बोगस बियाणे व खताची खुलेआम विक्री फर्टीलाईझर्स दुकानदार करीत असून येथील व्यापा-यांचा मनमानी कारभार चालु असुन यांना कृषी अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे ?
आधिच शेतकरी नैसर्गीक संकटात असून गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच शहरात मागील काळात युरिया खताचा काळा बाजार झाला असून एरवी शेतक-यांचे गुणगान गाणारे राजकीय नेते कुठे आहेत असा सवाल शेतकरी करित आहे. शहरात बोगस खत, बी बियाणाची विक्री करताना बिलावर कमी पैसे व शेतक-याकडुन जास्तीचे पैसे घेऊन शेतक-यांना लुटण्याची कामे फर्टिलाईझर्स दुकानदारा कडुन चालू असुन
कृषी अधिकारी
गेल्या दोन महिन्यापूर्वी शहरातील सिध्दराज फर्टीलाईझर्स खताच्या दुकानावर शेतक-यांनी खत घेण्यासाठी गेले असता दुकानदारांनी खत उपलब्ध नसल्याचे सांगितले होते शेतक-यांनी कृषी अधिकारी यांना तक्रार केली असता स्टाँक बुकवर १३३६ पोते असल्याचे आढळून आले तसेच गोडाऊनची तपासणी मध्ये खताचा मोठा साठा आढळून आल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई करुन एका महिन्यासाठी विक्री परवाना रद्द केला होता
उमरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुंजाळ यांची उमरी शहरातील दुकान तपासणीचे काम असून ते अद्यापही फिरकले नाही धाड पडली तेव्हाही आले नाही
उमरी शहरातील महेश कृषी सेवा केंद्रात किसान बोगस खत आढळून आले असून त्याच्यावर कारवाई होणार का
याकडे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उमरी शहरात
बोगस खत विक्री करणाऱ्यावर ठोस कार्यवाही करावी व शेतकर्यांची लिटर थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















