भोकर(प्रतिनिधी)तहसील कार्यालया समोर प्रा . लक्ष्मणराव हाके नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ व ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी संजय गौड ( आलेवार ) यांचे भोकर तहसील कार्यालया समोर प्रतिकात्मक चितेवर (सरणावर )आमरण उपोषण दि.२० जुन रोज गुरुवारी ११ वाजता पासून सुरु आहे.
न्याय हक्काच्या मागणीसाठी आगळे वेगळे चितेवर आंदोलन पहिल्यांदा भोकरच्या इतिहासात झाल्याचे दिसून येते. आंदोलनाची चर्चा महाराष्ट्रात सोशल मिडीया प्रिंट मिडीया च्या माध्यामातून सर्वत्र पसरली आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये,सगे सोयरे संदर्भातील जी. आर. काढण्यात येऊ नये,
बिहारच्या धरतीवर महाराष्ट्रात जातनिहाय जण गणना (सर्वे ) त्वरीत करा.ओबीसी आर्थिक विकास महामंडळाची तरतुद करा या मागणीसाठी सकल ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव संघर्ष समिती भोकर यांनी पांठीबा दर्शविला आहे.शहरात होत असलेल्या आगळे वेगळे आंदोलन पहाण्यासाठी आंदोलन स्थळी गर्दी दिसून आली.