कायम गावाच्या आपल्या शहराच्या हिताचा प्रश्न घेऊन जाणारा पक्ष म्हणजेच मनसे… आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने सन्माननीय आमदार साहेब समाधान दादा अवताडे यांना मनसे कडून श्रीकृष्ण तलाव येथे भव्य दिव्य अशी संतसृष्टी उभा करणे याबाबत पत्र देण्यात आले त्यांच्याशी चर्चा केली असता सकारात्मक उत्तर त्यांच्याकडून मिळाले.
आमदार साहेबांनी खरंच हा प्रश्न मनावर घेऊन लवकरात लवकर हे काम मार्गी लावा व मंजुरी करावं हीच अशा अपेक्षा आम्ही बाळगतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराच्या वतीने उष्णतालावर कृष्ण तलावात संत सृष्टी उभारणे बाबत माननीय आमदार समाधान दादा अवताडे यांच्याकडे मागणी पत्राद्वारे सादर केली कृष्ण तलाव 46 एकरात पसरलेला आहे परंतु 25 ते 30 वर्षे झाले त्याचे कडे सर्व नागरिक, शासकीय कार्यालय, राजकीय पदाधिकारी,
यांनी कधीही याचा विकास करणे बाबत वरीलपैकी कोणीच विचार व प्रयत्न केले नाही नाहीत त्यावर एक चांगला उपयोग व विकास म्हणून श्रीकृष्ण तलावात संतसृष्टी उभारली तर मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडून पर्यटनाला वाव मिळेल शासनाच्या उत्पन्नात भर पडेल स्थानिकांना रोजगार मिळेल व इतर अनेक चांगल्या गोष्टी घडतील परंतु दुर्दैवाने याबाबत कोणीही विचार केला नाही याआधी मी माननीय श्री राज साहेब ठाकरे यांची देखील संतसृष्टीसाठी भेट घेतली आहे त्यांनीही याकरिता सकारात्मक उत्तर मला दिलेला आहे
परंतु आपल्या गावचे हक्काचे आमदार म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला सकारात्मक उत्तर दिलेला आहे तरी पंढरपूर येथील तुळशीबाग धरतीवर असेच एक ठिकाण झाडे ,तलाव, संतांच्या प्रतिमा, संतांच्या जीवनागाथा ,बोधकथा, दर्शक ठिकाण झाल्यास लहान मुले वयोवृत्त सर्व नागरिकांना कृष्ण तलाव हे एक हक्काचे पर्यटन स्थळ होईल
तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने विनंती केली की 46 एकर मध्ये संत सृष्टी भव्य दिव्य प्रोजेक्ट तयार करून जास्तीत जास्त निधी व मान्यता मिळवून हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे ही आम्ही नम्र विनंती केली तरी हे काम लवकरात लवकर दादा तडीस नेतील एक अशा अपेक्षा आहे असे राजवीर हजारे मनसे शहराध्यक्ष यांनी सांगितले