नवीन नांदेड प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचे प्रस्थ असताना या देशात समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्याची बीजे परणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कोल्हापूर संस्थान अस्तित्वात होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक समितेची बीजे पेरणारे राजे म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा गौरव केला जातो. राजर्षी छत्रपती शाहूंच्या पुरोगामी आणि मानवतावादी राजकारभाराची तत्वप्रणाली ही भारतीय संविधानाचा पाया आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य शेखर घुंगरवार यांनी केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिन वसंतराव नाईक महाविद्यालयात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.आर.डी.मोरे ,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शेषराव शेटे आणि गणित विभागाचे प्रा.डॉ.संतोष शिंदे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. पी.दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. साहेबराव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. जी. वेणुगोपाल, डॉ.अनिल गच्चे, डॉ नागेश कांबळे, डॉ. गणेश लिंगमपल्ले, डॉ.सुनिता गरुड, कार्यालयीन अधीक्षक श्री. आर. डी. राठोड, डॉ. संजय गिरे,डॉ.उत्तम कानवटे, डॉ. आर. एम कागणे, डॉ. साहेबराव मोरे, डॉ.विजयकुमार मोरे, प्रा.जायदे मॅडम, प्रा.नंदिनी सुधळकर,प्रा.माधव मुस्तापुरे, प्रा. शेख,प्रा.कोतवाल,प्रा.कपील हिंगोले,प्रा.शशीकांत हाटकर,प्रा.नितीन मुंडलोड यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
———



















