बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
वाशी शहरातील शेतकऱ्यांना शासकीय योजना चालू करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिवाजी चौकात उपोषण सुरू असून आज तिसरा दिवस चालू आहे. त्यांच्या उपोषणास वाशी येथील अनेक पुढाऱ्यांनी भेटी देऊन त्यांची कौतुक केले व उपोषणास पाठिंबा दिला.
रोजगार हमी योजना चालू करावी सिंचन विहीर, शेततळे, व्हर्मी कंपोस्ट, नाडे कंपोस्ट, शौचालय, घरकुल, शेळी पालन शेड, गाय गोठा, कुक्कुटपालन शेड, कांदा चाळ यासारख्या योजनेपासून वाशी शहरातील शेतकरी वंचित आहेत. या योजना मिळण्यासाठी नगरपंचायत कडून काहीही प्रयत्न झाला नाही. त्यासाठी वाशी येथील काँग्रेसचे अमर तागडे व दिलीप क्षीरसागर हे शिवाजी चौकात सोमवार पासून उपोषणास बसले आहेत. दुसऱ्या दिवशी ५ वाजता नगरपंचायतचे अधिकारी श्री सयाजी माने साहेब, क्षीरसागर वगैरे अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.