*खाजगी सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने तरुणाची रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या…
सावकारासह अन्य दोन जनावर गुन्हा दाखल..*
सांगोला (तालुका प्रतिनिधी) खाजगी सावकाराने व त्याच्या दोन साथीदारांनी व्याजाचा तगादा लावल्याने तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवण्याची दुर्दैवी घटना सोमवार दि.१ जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सांगोला येथील वासुद रोडवरील रेल्वे ट्रॅकवर घडली आहे. सोनू उर्फ अनिरुद्ध शिवाजी डांगे वय २५ रा. खडतरे गल्ली सांगोला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होय.
प्रफुल्ल शिवाजी डांगे रा. खडतरे गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डांगे कुटुंबीय मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवितात भाऊ अनिरुद्ध हा सांगोला शहरातील मिरज रोडवरील कृषी दुकानात कामास होता अनिरुद्ध याने घरगुती अडचण असल्याचे सांगून चार महीन्यापुर्वी रोहीत देठे रा. मस्केकॉलनी, एखतपूर रोड सांगोला या सावकाराकडून पंधरा हजार रुपये दर आठवड्याला ३०% व्याजदराने पैसे घेतले होते हे फिर्यादी भाऊ प्रफुल्ल यास सांगितले होते तसेच भाऊ अनिरुद्ध हा रोहित देठे यास जर आठवड्याला चार हजार रुपये व्याज देत होता त्यामुळे तो सतत तणावात होता रोहित देठे हा दर आठवड्याला चार हजार रुपये व्याजाचे पैसे मागण्याकरता येऊन मानसिक त्रास देऊन वारंवार पैशाचा तगादा लावत होता असेही भाऊ अनिरुद्ध सांगत होता फिर्यादी प्रफुल्ल त्यास अनिरुद्ध यास मानसिक आधार देऊन शांत करीत असे पंधरा दिवसापूर्वी भाऊ अनिरुद्ध याने रडत येऊन खाजगी सावकार रोहित देठे याने एमएच ०३ एवाय २२१० ही दुचाकी व विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला होता त्यामुळे तो जास्तच तणावात होता
दरम्यान फिर्यादी अनिरुद्ध याने रोहित देठे यास समक्ष भेटून मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले होते त्यावेळी रोहित देठे याने तू आत्महत्या कर पण मला माझे आत्तापर्यंतचे व्याज व मुद्दल आणून दे असे सांगितल्याने प्रफुल्ल हा खूप खचला होता त्यामुळे मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे सांगत होता फिर्यादी प्रफुल्ल याने भाऊ अनिरुद्धची असे काही डोक्यात आणू नकोस म्हणून समजूत काढली होती रविवार ३० जून रोजी रात्री दहा वाजता सावकार रोहित देठे व इतर अनोळखी दोन जण फिर्यादी प्रफुल्ल व अनिरुद्ध राहत असलेल्या घरी आला होता व त्याने तू काहीही कर पण माझे व्याजाचे पैसे व मुद्दल आता लगेच दे यावेळी अनिरुद्ध याने
सध्या माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे येतात मी तुमचे व्याज व मुद्दल देतो असे सांगितले होते त्यावर अनिरुद्धने सावकाराकडून एक दिवसाची मुदत मागून घेतली होती एक जुलै रोजी अनिरुद्ध हा सकाळी सव्वानऊ वाजता घरून कामावर जात आहे असे सांगून गेला होता दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अनिरुद्ध याने सांगोला मिरज ट्रॅकवर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आत्महत्या घटना समजली याबाबत प्रफुल्ल डांगे याने भाऊ अनिरुद्ध याने व्याजापोटी दिलेल्या पैश्याबाबत वारंवार तगादा लावुन, शिवीगाळी,दमदाटी करून तु आत्महत्या कर नाहीतर काहीही कर पण आम्हाला व्याजाचे पैसे दे अशी धमकी दिली होती म्हणुन खाजगी सावकार रोहीत देठे व दोन अनोळखी इसमा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
कोट… अनिरूद्ध याने खाजगी सावकाराच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे मयत अनिरुद्ध व इतर नातेवाईक यांनी जोपर्यंत खाजगी सावकार व अनोळखी दोन लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती पोलिसांनी खाजगी सावकार व इतर दोन लोकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला